मुंबई ः प्रतिनिधी
भारतीय क्रिकेटपटू आणि सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा शिखर धवनने नुकताच इन्स्टाग्रामवर एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या दोन तासांत या व्हिडिओला साडतीन लाखांहून अधिक जणांनी लाइक मिळालेत. शिखर धवनचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओखाली धवनने ‘कोण चांगला डान्स करतो, आपल्या कमेंट्स द्या’, असे कॅप्शन दिले आहे, तसेच हा व्हिडिओ त्याने स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत, आर. अश्विन, अजिंक्य रहाणे यांना टॅग केला आहे. नेटीझन्सही गमतीदार कमेंट्स देत आहे. काही जणांनी तर गब्बर डान्स असल्याच्या कमेंट्स दिल्या आहेत.
धवन सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या पोस्टची चाहतेही आतुरतेने वाट पाहात असतात. काही दिवसांपूर्वी फिरकिपटू यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत त्याने डान्स केला होता. धनश्रीसोबत तो भांगडा डान्स करताना व्हिडिओत दिसला होता. गब्बरच्या स्टाइलमध्ये भांगडा असे कॅप्शन देत हा व्हिडिओ धनश्रीने इन्स्टाग्राम शेअर केला होता.