Monday , February 6 2023

रेल्वेला लवकरच येणार अच्छे दिन! प्रवासी भाड्यात होणार वाढ; रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

रेल्वे प्रवाशांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच रेल्वे भाड्याने देणार आहे. तसेच रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वेप्रवाशांसाठी हा मोठा निर्णय असणार आहे. रेल्वेचा प्रवास महागणार असल्याने रेल्वेला अच्छे दिन येणार आहेत. भाडेवाढीचा निर्णय जाहीर होणार आहे.  रेल्वेचा प्रवास आता महागणार आहे. कारण, लवकरच रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ करणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली आहे. त्याचप्रमाणे मालवाहतूक भाड्यातही कपात होणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

आठवडाभरात भारतीय रेल्वे तिकिटांच्या किंमती वाढविण्याच्या विचारात असल्याने रेल्वे प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. रेल्वेने आपला महसूल वाढवण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी योजना तयार केली आहे. वातानुकूलित आणि स्लीपर प्रवासासाठी भाडे वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्या व्यतिरिक्त, उपनगरी रेल्वेच्या दरांमध्येही वाढ होऊ शकते. त्यामुळे मुंबईतील लोकल प्रवासही महागण्याची शक्यता आहे. तिकिटाबरोबरच रेल्वे पासही महागण्याची शक्यता आहे. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान भारतीय रेल्वेच्या माल वाहतुकीत 19,412 कोटी रुपयांची घट झाली आहे. अर्थव्यवस्थेच्या नेहमीच्या परिस्थितीमुळे भारतीय रेल्वेला हे नुकसान भरून काढणे कठीण झाले आहे. गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वे प्रवासी भाडेवाढीसाठी गेलेली नाही. त्यामुळे ही भाडेवाढ करण्यात येणार आहे. तर मालमाहतुकीला झुकते माप देण्यात येणार आहे.

प्रस्तावाला केंद्राचा हिरवा कंदिल

रेल्वे मंत्रालयाने भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. रेल्वे भाडेवाढ करण्याबाबत काम करण्यात येत होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे रेल्वेची भाडे प्रति किलोमीटर पाच ते 40 पैशांनी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. संसदीय स्थायी समितीच्या अहवालात प्रवासी भाड्यांबाबत फेरविचार करण्याचा सल्ला नुकताच देण्यात आला होता.भारतीय रेल्वेला झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी  प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply