पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती नगरविकास विभागाकडून करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी पनवेल महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी सुद्धा ते पनवेल नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी कार्यरत होते. तसेच काही कालावधीसाठी त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यामुळे त्यांना पनवेलच्या राजकीय व भौगोलिक परिस्थितीची पूर्ण माहिती असलेले असे आयुक्त असणार आहेत.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper