पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. त्यातच रुग्णांना अत्यावश्यक रक्ताचा तुटवडासुद्धा वाढत आहे. याचीच जाणीव मनाशी बाळगून भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिर 14 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालय, कामोठ्यातील सुषमा पाटील विद्यालय आणि खारघर से. 11 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
कोविड-19 महामारीदरम्यान रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी दात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …