पनवेल ः रामप्रहर वृत्त
पावसाळा तोंडावर असल्याने कामोठे येथील नालेसफाई, ड्रेनेज आणि गटारांवरील झाकणे बसवणे ही मान्सूनपूर्व कामे लवकरात लवकर व्हावी याकरिता पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामोठ्यातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांसमवेत तेथील सिडको कार्यालयात अधिकार्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. 27) झाली.
या बैठकीस स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक विजय चिपळेकर, डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, हरेश केणी, नगरसेविका कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, अरुणा भगत, कार्यकारी अभियंता बनकर, सिडको अधिकारी जगताप, संदीप तुपे, आर. जी. म्हात्रे, राजेश गायकर आदी उपस्थित होते. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ही कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, असे निर्देश सिडको अधिकार्यांना दिले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …