Breaking News

भाजप सदस्य नोंदणी अभियानासंदर्भात आज आढावा बैठका

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपच्या वतीने संपूर्ण देशभर सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियानाचा पनवेलमधील आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 26) बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांसाठी भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण चतुर्वेदी आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

पहिली आढावा बैठक युवा मोर्चासाठी असून, ती खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात सकाळी 10 वाजता होणार आहे. या बैठकीच्या प्रारंभी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यानंतर भाजपची बैठक 11 वाजता पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे.

या बैठकांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, सभापती, नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख, प्रभाग अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख कायर्र्कर्ते उपस्थित राहणार आहेत.

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply