कळंबोली : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या कळंबोली येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी मतदारांच्या भेटीगाठीवर भर देण्यात आला.
महायुतीच्या प्रचार कार्यालय उद्घाटन समारंभास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत, सल्लागार बबन पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, अशोक मोटे, शिवसेना शहरप्रमुख अविनाश कोंडिलकर, नगरसेवक अमर पाटील, महादेव मधे, नगरसेविका प्रमिला पाटील, मोनिका महानवर, भाजप शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे, राजेंद्र बनकर, विश्वास पेटकर, पंचायत समितीच्या माजी सदस्या ज्योत्स्ना गडहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, कळंबोलीमध्ये मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेण्याची महायुतीच्या कार्यकर्त्यांची ही दुसरी वेळ आहे. त्यास मतदारांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे या वेळी दिसून आले.