Breaking News

नवी मुंबईत झाडांची कत्तल; लाकूडतोडे अटकेत

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईतील पारसिक हिलवरील झाडे तोडणार्‍यांना पारसिक हिलवरील नागरिकांनी सकाळी रंगेहाथ पकडले. या भागातील झाडे अज्ञातांकडून तोडली जात होती. अखेर 29 मे रोजी या लाकूड तोड्यांना राहिवाशांकडून रंगेहाथ पकडण्यात आले. नवी मुंबई बेलापूर येथे असलेल्या पारसिक हिलवरील हिरवळीला काही महिन्यांपासून दृष्ट लागलेली पाहायला मिळत होती. या झाडांचे निरीक्षण केल्यावर या झाडांचीमुळे कापण्यात येत होती. त्यामुळे झाडे वाळत असल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात रहिवाशी सकाळी फेरफटका मारत असताना काही महिला व मुलींना सुकलेली व काहीशी ओलसर लाकडे घेऊन जातात रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून माहिती घेतली असता झोपडपट्टी राहणारे हा नागरिक असून सरपणासाठी लाकूडतोड करण्यात येत असल्याचे उघड झाले. याबाबत पारसिक हिल नागरिकांनी अधिकार्‍यांना बोलावून कारवाईची मागणी केली. मात्र अद्याप कारवाई झाली नसल्याची खंत पारसिक हिल रेसिडेंस असोसिएशनचे अध्यक्ष जयंत ठाकूर यांनी व्यक्त केली.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply