Breaking News

रेल्वेस्थानकांच्या नामांतराचा प्रश्न अधिवेशनात आमदार महेश बालदी यांचे

धुतूम ग्रामस्थांकडून आभार

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील द्रोणागिरी, न्हावा शेवा आणि रांजणपाडा या चूकीच्या रेल्वे स्थानकातील नावात दुरुस्ती करून बोकडविरा, नवघर आणि धुतूम अशा मुळ गावाच्या नावावरून रेल्वे स्थानक म्हणून नामकरण करण्यात यावे यासाठी राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उरणचे आमदार महेश बालदी यांनी प्रश्न उपस्थित करून नामकरणासाठी आंदोलन उभारणार्‍या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची दखल घेतली असल्याने आमदार महेश बालदी यांचे धुतूम ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी एकदिलाने अभिनंदन करून आभार मानले. धुतूम ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश ठाकूर यांनी सांगितले की, सिडको आणि रेल्वे प्रशासनाने उरण तालुक्यातील बोकडविरा,नवघर आणि धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना विश्वासात न घेता सदर महसूली गावांची नावे ही सदर रेल्वे स्थानकाना न देता द्रोणागिरी, न्हावाशेवा आणि रांजणपाडा अशा प्रकारे चुकीच्या गावांचे नामकरण करुन गाव परिसरात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या निषेधार्थ आणि मुळ महसूली गावांची नावे रेल्वे स्थानकाना देण्यात यावी यासाठी इतर गावा प्रमाणे धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्तांनी नुकताच सिडको, रेल्व स्थानकात एकदिलाने मोर्चा काढून आंदोलन उभारण्यात आले होते. या मोर्चाची आंदोलनाची दखल उरणचे आमदार महेश बालदी यांनी घेऊन विधानसभेच्या अधिवेशनात प्रकल्पग्रस्तांचा आवाज उठवला आहे. त्याबद्दल धुतूम ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकदिलाने बालदी यांचे आभार व्यक्त केले आहे. या वेळी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता  पाटील, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply