Breaking News

पेण एसटी आगारातील कार्यशाळेची दुरवस्था; कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात

पेण : प्रतिनिधी

दुर्गंधीयुक्त, अस्वच्छ परिसर आणि अपुर्‍या सोयी सुविधा यामुळे पेण एसटी आगारामधील कार्यशाळेतील  कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, या परिस्थितीची माहिती असतानादेखील वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचार्‍यांत नाराजी व्यक्त होत आहे. एसटीच्या पेण आगारातील कार्यशाळेच्या पत्र्याची शेड जुनी झाली असून, त्यातील काही पत्रे फुटले असल्याने पावसाचे पाणी खाली पडते. या साचलेल्या  पाण्यात बसूनच कामगारांना गाड्यांची दुरुस्ती करावी लागत आहे. ऑफिसमधील कर्मचार्‍यांनादेखील पाण्यातच खुर्ची आणि टेबल मांडून काम करावे लागत आहे. स्वच्छतागृहाची फारच दूरावस्था झाली आहे. या परिस्थितीत जर बदल झाला नाही तर  कामबंद आंदोलन करण्याचा इशारा येथील कामगारांनी दिला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply