Breaking News

उरणमध्ये गॅसची पाइपलाइन फुटली

उरण : वार्ताहर

उरण चारफाटा जवळील एमटीएनएलच्या केबल दुरुस्तीचे काम सुरू असतानाच शनिवारी (दि. 3) दुपारच्या सुमारास महानगर गॅसची पाइपलाइन फुटली. वेळीच गॅसची पाइपलाइन बंद करण्यात यश आल्याचे पुढील अनर्थ टळला.

उरण तालुक्यातील ओएनजीसी-चारफाटा रस्त्यावर एमटीएनएलचे दुरुस्तीचे काम सुरू होते. केबल दुरुस्तीसाठी  खोदाईचे काम सुरू असतानाच जेसीबी मशीनच्या बकेटचा धक्का लागला आणि उरण शहराला घरगुती गॅसचा पुरवठा करणारी महानगर गॅसची पाइपलाइन फुटली. गॅसलाइन फुटल्याने गॅस हवेत पसरुन दुर्घटनेची भीती निर्माण झाली होती. प्रसंगावधान राखून कर्मचार्‍यांनी घटनेची माहिती महानगर गॅसला दिली. त्यानंतर गॅसलाइन तत्काळ बंद करण्यात आली.

घटनास्थळी उरणचे पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत आणि सिडकोच्या, ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. सावधगिरी बाळगुन रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply