पेण : प्रतिनिधी
दुर्गंधीयुक्त, अस्वच्छ परिसर आणि अपुर्या सोयी सुविधा यामुळे पेण एसटी आगारामधील कार्यशाळेतील कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, या परिस्थितीची माहिती असतानादेखील वरिष्ठ अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचार्यांत नाराजी व्यक्त होत आहे. एसटीच्या पेण आगारातील कार्यशाळेच्या पत्र्याची शेड जुनी झाली असून, त्यातील काही पत्रे फुटले असल्याने पावसाचे पाणी खाली पडते. या साचलेल्या पाण्यात बसूनच कामगारांना गाड्यांची दुरुस्ती करावी लागत आहे. ऑफिसमधील कर्मचार्यांनादेखील पाण्यातच खुर्ची आणि टेबल मांडून काम करावे लागत आहे. स्वच्छतागृहाची फारच दूरावस्था झाली आहे. या परिस्थितीत जर बदल झाला नाही तर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा येथील कामगारांनी दिला आहे.