पनवेल ः प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनतर्फे रायगड जिल्हा परिषदेच्या भाताण शाळेस हॅप्पी स्कूल प्रोजेक्टस अंतर्गत ई-लर्निंगसाठी प्रोजेक्टर, इतर शैक्षणिक व भौतिक सुविधांची मदत देण्यात आली. शुक्रवारी (दि. 25) डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुळकर्णी यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले.
या वेळी हॅप्पी स्कूल प्रोजेक्टच्या चेअरमन संजीवनी मालवणकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचे प्रेसिडेंट संजय झेमसे, प्रसाद देशमुख, प्रशांत माने, युथ डायरेक्टर विक्रम धुमाळ, सविता झेमसे, शिल्पा चंदने, उपसभापती वसंत काठावले, सरपंच सुभाष भोईर, शाळा समिती अध्यक्ष विनायक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सौ. जुमारे, अनिल काठावले, मुख्याध्यापिका देवरुखकर, शिक्षक गजानन मानकर, मिरजकर सर, म्हात्रे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.
पनवेल तालुक्यातील भाताणसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची सुविधा प्राप्त होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनने हॅप्पी स्कूल प्रोजेक्टस अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर, चार खोल्यांचे इलेक्ट्रिक फिटिंग, टेबल, कपाट, व्हीलचेअर, लेझीम, ताशा, गोष्टीची पुस्तके व खेळाचे साहित्य भेट दिले.
या वेळी हॅप्पी स्कूल प्रोजेक्टच्या चेअरमन संजीवनी मालवणकर व शिक्षक गजानन मानकर यांच्या प्रयत्नामुळे शाळेला शैक्षणिक व भौतिक सुविधांची मदत मिळाल्याबद्दल त्यांचे उपसभापती वसंत काठावले यांनी आभार मानले.