कला, वाणिज्य दोन्ही शाखेत मुलींचीच बाजी
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजचा एचएससी अर्थात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 2022चा निकाल 98.57 टक्के लागला असून कॉमर्स विभागाचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा निकाल 97.91 टक्के इतका लागला.
कला शाखेची विद्यार्थिनी प्रज्ञा राजेंद्र चौधरी ही 85.50 टक्के इतके गुण प्राप्त करून विद्यालयात व कला शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर कला शाखेचीच रिद्धी सुभाष कडू हिने 79 टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. वाणिज्य शाखेतून आकांक्षा ज्ञानेश्वर म्हात्रे हिने 77 टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात तिसरा आणि वाणिज्य विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व विद्यालयाचे आधारस्तंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य आणि विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन केले.
विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय घरत, विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक जगन्नाथ जाधव, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्यद्वय प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे आदींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाखा निहाय प्रथम तीन क्रमांक
कला शाखा :
प्रथम – प्रज्ञा राजेंद्र चौधरी (82.50 टक्के)
द्वितीय – रिद्धी सुभाष कडू (79 टक्के)
तृतीय – कुंता नवनाथ काकडे (73.17 टक्के)
वाणिज्य शाखा :
प्रथम – आकांक्षा ज्ञानेश्वर म्हात्रे (77 टक्के)
द्वितीय – रक्षा एकनाथ कोळी (75.33 टक्के)
तृतीय – सायली मदन पाटील (69 टक्के)