Breaking News

व्हेलच्या उलटीची तस्करी करणार्‍यास अटक

रायगडातील दुसरी घटना, सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

माणगाव ः प्रतिनिधी
व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अलिबागमधील व्यक्तीला झालेल्या अटकेची घटना ताजी असतानाच माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे बुधवारी (दि. 6) रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रत्नागिरी येथून मोटरसायकलवर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या एकाला पकडले आहे. या आरोपीकडून पाच किलो वजनाची अंदाजे पाच कोटी रुपये किमती उलटीसह मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे.
रत्नागिरी येथून एक जण व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी रायगडात येणार असल्याची माहिती रायगडच्या स्थानिक अन्वेषण गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कदम यांनी लोणेरे येथे मोटरसायकलवरून आलेल्या संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच किलो वजनाची उलटी जप्त करण्यात आली, जिची किंमत पाच कोटी आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply