उलवे : रामप्रहर वृत्त : उलवे नोड परिसरात वाढते नागरीकरण लक्षात घेता या परिसरात नवनवीन उद्योगांना चालना मिळत आहे. त्याअंतर्गत सेक्टर 9 येथे ‘अरबन नेशन’ या जिमची दुसरी शाखा सुरू करण्यात आली. अरबन नेशन या जिमच्या दुसर्या शाखेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले.
उलवे नोड येथील सेक्टर 9 मध्ये ‘अरबन नेशन’ या जिमची दुसरी शाखा नव्याने सुरू झाली. या शाखेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या जिमच्या उद्घाटनाच्या वेळी भाजपचे उलवे नोड 2 चे अध्यक्ष विजय घरत, अनंता ठाकूर, युवा नेते साईचरण म्हात्रे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष निर्गुण कवळे, गजानन घरत, काशिनाथ पाटील, किशोर पाटील, राजेश पाटील, भाऊ भोईर, विकी पाटील, दामोदर भोईर, पी. के. ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून जिमच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या.