Breaking News

मुरूडमध्ये पर्यटकांवर पोलिसांची कारवाई

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड

मुरूड ः प्रतिनिधी
कोरोनाचे नियम झुगारून मुरूड समुद्रकिनारी मौजमजा करणार्‍या पर्यटकांवर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. या पर्यटकांना दंड ठोठावण्यात आला.
शासनाच्या आदेशान्वये जिल्हानिहाय कोरोनाबाधित रुग्णसंख्येनुसार असलेला पॉझिटिव्ह रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या बाबींचा सर्वंकष विचार करून लागू करावयाच्या निर्बंधाबाबत विविध स्तर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मागील दोन आठवड्यांचा पॉझिटिव्ह रेट विचारात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात तिसर्‍या स्तराचे सुधारित निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागेत संपूर्ण आठवडाभर सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंतच चालणे, सायकलिंग करणे यास मान्यता आहे तसेच बाह्य मैदानी खेळास 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत व सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी आहे. असे असताना मुरूडमध्ये मंगळवारी (दि. 6) दुपारी 4.30च्या सुमारास समुद्रकिनारी आलेले पर्यटक क्रिकेट खेळताना आढळले, तर काही पर्यटक समुद्रकिनारी पोहण्याचा आनंद लुटत होते. या 12 पर्यटकांवर स्थानिक पोलिसांनी कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply