Breaking News

खडसेंना ‘ईडी’कडून धक्का

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी जावयाला अटक

मुंबई ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी चौधरी यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी एमआयडीसी येथील सर्वे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची नोंद झाली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले.
याआधी ईडीकडून भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या जावयाच्या रूपाने या प्रकरणात पहिली अटक झाली आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply