Breaking News

भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा महिला कार्यकारिणीची बैठक उत्साहात; पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा महिला कार्यकारिणीची बैठक रविवारी (दि. 11) पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून ओबीसी मोर्चा प्रदेश महिला संपर्कप्रमुख वनिता लोंढे यांची उपस्थिती लाभली. या वेळी जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका तथा ओबीसी मोर्चा रायगड जिल्हा महिला अध्यक्ष सीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस भाजपच्या ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष नैना भोईर, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, प्रमिला पाटील, महिला मोर्चा शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या वेळी भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड आणि विभागीय महिला कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये जिल्हा सरचिटणीस कुसुम रवींद्र म्हात्रे, उपाध्यक्ष शिल्पा म्हात्रे, पनवेल मंडल अध्यक्ष वृषाली वाघमारे, उपाध्यक्ष राजश्री वावेकर, सरचिटणीस हेमांगी वाघमारे, अभिलाषा ठाकूर, सदस्य विभूती तांडेल, शैला आंबेकर, भारती घरत, चांगुणा म्हात्रे, मेघा कोळी, कामोठे मंडळ अध्यक्ष वनिता महादेव पाटील, सरचिटणीस रोहिणी कंक, कळंबोली मंडल अध्यक्ष प्रमिला पाटील, उरण मंडल अध्यक्ष सुनीता कटेकर, सदस्य माई गायकर, मनीषा पाटील यांचा समावेश होता. या सर्वांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply