Breaking News

भारतीय संघात चिंतेचे वातावरण; ऋषभ पंतनंतर स्टाफ मेंबर कोरोनाबाधित

लंडन ः वृत्तसंस्था

इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली आहे. पंतपाठोपाठ आणखी एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा सदस्य संघातील खेळाडू नसून सपोर्ट स्टाफ मेम्बर असल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार, ऋषभ पंतसह भारतीय संघातील आणखी चार सदस्य डरहॅमला जाऊ शकणार नाही. यामध्ये एका सपोर्ट स्टाफसह तीन कोचिंग असिस्टंचा समावेश आहे. या चौघांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. इंग्लंड क्रिकेट संघावर कोरोनाचे सावट असतानाच भारतीय संघातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतला घसा खवखवण्याचा त्रास जाणवत होता. यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली. पंत मागील आठ दिवसांपासून विलगीकरणात आहे. दरम्यान, पंतच्या संपर्कात आलेल्या इतर खेळाडू आणि इतर कर्मचार्‍यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये आढळणारा डेल्टा व्हेरियंट पंतमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय खेळाडूंना बायो बबलमधून बाहेर पडत वेळ घालवण्याची परवानगी देण्यात आली होती. 23 जूनला चॅम्पियनशिपची फायनल झाली. बीसीसीआयनेही परवानगी देताना खेळाडू आणि इतर कर्मचारी जुलैच्या मध्यात पुन्हा बायो बबलमध्ये परततली असे स्पष्ट केले होते. भारतीय संघ इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार असून 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply