नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नेरूळ नोडमधील प्रभाग 96मध्ये नेरूळ सेक्टर 16, 16ए आणि 18 या परिसरात श्री. गणेशजी नाईक चॅरिटेबल संस्था आणि भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली किस्मत भगत व जनसेवक गणेश भगत यांच्या माध्यमातून मास्क वाटपास सुरूवात झाली आहे.
सेच्युरी सोसायटीमध्ये घरोघरी जावून मास्क वाटप करण्यात आले. त्यानंतर प्रभागातील सर्व रिक्षा स्टॅण्ड, सर्व फेरीवाले, भाजी मार्केटमधील विक्रेत्यांना व ग्राहकांना मास्कचे वाटप करण्यात आले. प्रभागात 7500 हून अधिक मास्कचे वाटप केले जाणार असून प्रभागातील सर्व गृहनिर्मांण सोसायट्या व मार्केट येथेही मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.
मास्क वाटप करताना जनसेवक गणेश भगत यांच्यासमवेत ज्येष्ठ समाजसेवक अनंत कदम, चंद्रकांत महाजन, रमेश नार्वेकर, दत्तात्रय तोंडे, सागर मोहिते, मंगेश कदम, अजय खंबे, रवींद्र भगत उपस्थित होते.