Breaking News

खालापूर विभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

खालापूर : प्रतिनिधी

खोपोली, खालापुरातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली असतानाच गुरुवारी (दि. 23) कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्‍या खालापूर उपविभाग पोलीस कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हे कार्यालय बंद करण्यात आले. मात्र त्याची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी कार्यालयात दूरध्वनी केला असता संपर्क होऊ शकला नाही.

 खाजगी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत बुधवारी खालापूर विभागीय पोलीस कार्यालयातील दोन कर्मचारी  कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांची व इतर पोलीस कर्मचार्‍यांची पुन्हा खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली असल्याची माहिती खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निमिष धेंडे यांनी दिली.

खालापूर विभागीय पोलीस कार्यालयातील तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळण्याची शक्यता आहे. त्याचा येथील कामकाजावर परिणाम झाला आहे. मात्र   कार्यालय सुरू असल्याचे कार्यालयीन प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास कराळे यांनी सांगितले.

याबाबत माहिती घेण्यासाठी खालापूर तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद रोकडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी न उचलण्याचे सौजन्य दाखवले.

दरम्यान, तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू  असतानाच खालापुरातील सर्व शासकीय कार्यालयात कोरोनाविषयक नियम धाब्यावर बसविण्यात येत असल्याचे चित्र आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply