Breaking News

अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

सीबीआयच्या एफआरआर विरोधातील याचिका फेटाळली

मुंबई ः प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका गुरुवारी (दि. 22) न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे हा देशमुख यांच्यासोबतच महाराष्ट्रातील ठाकरे सरकारलादेखील हा मोठा झटका मानला जात आहे.
अनिल देखमुख यांनी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यावरच आक्षेप घेतलेला असताना महाराष्ट्र सरकारने त्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या आणि बदल्या तसेच सचिन वाझे यांच्याबाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेत तो भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाला केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमधील दोन परिच्छेदांमध्ये या संदर्भातील उल्लेख करण्यात आले होते, मात्र न्यायालयाने या दोन्ही याचिका फेटाळल्यामुळे राज्य सरकारसाठीदेखील हा धक्का ठरला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचा सीबीआयचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणावर आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या असल्याने देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply