महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून अधिकार्यांना सूचना
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रात अमृत योजनेंतर्गत विविध कामे सुरू आहेत, मात्र सद्यस्थितीत ही कामे संथगतीने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी (दि. 25) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा आणि वयाळ येथील प्लांटला भेट देऊन कामाचा आढावा घेतला तसेच या कामाला गती देण्याची सूचना अधिकार्यांना केल्या. पनवेल महापालिका हद्दीतील गावांना व शहरांना मुबलक पाणी मिळावे याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने पनवेल महापालिकेला अमृत योजना मंजूर झाली आहे. केंद्र शासन पुरस्कृत असलेल्या या योजनेनुसार महापालिका हद्दीतील 29 महसूल गावांत एकूण 40 पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. व त्यासोबत गावांमध्ये अंतर्गत एकूण 165 किलोमीटर नवीन पाईपलाईनची जोडणी करण्यात येणार आहे, मात्र सद्यस्थितीत अमृत योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणार्या भोकरपाडा आणि वयाळ येथील प्लांटची अधिकार्यांसह पाहणी करून कामासंदर्भात चर्चा केली व कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. या वेळी नगरसेवक अनिल भगत, एमजेपीचे कार्यकारी अभियंता विजय सुर्यवंशी, उपअभियंता के. बी. पाटील, महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.