नवी दिल्ली ः केंद्र सरकारने वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मेडिकल क्षेत्रातील शैक्षणिक प्रवेशांसाठी देशभरात यंदा इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय स्तरावर मेडिकलच्या प्रवेशासाठी ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण आणि ईडब्ल्यूएस वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा जवळपास 5,550 विद्यार्थ्यांना होणार आहे. या आरक्षणातून एमबीबीएस, एमी, एमएस, डिप्लोमा, बीडीएस, एमडीएसच्या 2021-22 व यानंतरच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळणार आहे. या दोन्ही घटकांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटलेय.
Check Also
पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्या प्रयोगशाळांवर कारवाई करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्या …