लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व कांदळगावकर दाम्पत्याचा उपक्रम
कर्जत : बातमीदार
पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नेरळ येथील नितीन कांदळगावकर, नम्रता कांदळगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ येथील जेनी टूलीप शाळेत नुकताच 101वे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 80रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली, त्यापैकी मोतीबिंदू दोष आढळल्याने 23 रुग्णांच्या डोळ्यांवर लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
या 101व्या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजक कांदळगावकर दाम्पत्य तसेच अनिल पटेल, अनिल जैन, डॉ. वृषाली पाटील आदी उपस्थित होते. डॉ. वृषाली पाटील, तसेच श्वेताली आंग्रे, श्रुती गायकवाड, शिवाजी महाडिक, सृष्टी कुरुगले, विनोद पाचघरे, अंकुश साखरे, जितेंद्र जाधव यांनी शिबिरार्थींची नेत्र तपासणी केली. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मिलिंद कोशे, विकास अहिर, सखाराम कडाली यांनी विशेष परिश्रम घेतले.