Breaking News

महाडमधील महिलांना कपड्यांचे वाटप

भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलतर्फे मदत

महाड ः रामप्रहर वृत्त

अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात महाडमधील महिलांना भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलच्या वतीने नुकतेच कपड्यांचे वाटप करण्यात आले.

महाडमधील पूरग्रस्तांसाठी मदत व्हावी यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर यात योगदान देण्याचे आवाहन नागरिकांनाही करण्यात आले आहे. जमा झालेली मदत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाडमध्ये जाऊन पूरग्रस्तांना केली जात आहे. या काळात पूरग्रस्त महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः त्यांना कपड्यांचा तुटवडा जाणवत आहे. हे लक्षात घेऊन भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलतर्फे विविध प्रकारची वस्त्रे, तसेच सॅनिटरी नॅपकिन जमा करून हे सर्व महाड येथे जाऊन महिलावर्गास देण्यात आले.

या वेळी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, रूचिता लोंढे, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, रायगड आत्मनिर्भर भारतच्या संयोजक नूतन पाटील, युवा मोर्चा शहर चिटणीस कोमल पाटील, सपना पाटील, सुहासिनी केकाणे, आदिती मराठे, मनीषा चिले, मयुरी उनाटकर, करिष्मा म्हात्रे, सारिका म्हात्रे, मीनाक्षी म्हात्रे, पल्लवी म्हात्रे, प्रणाली म्हात्रे, प्रज्ञा म्हात्रे, किरण जाधव आदी उपस्थित होत्या.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply