Breaking News

‘रोटरी‘चा पदग्रहण सोहळा उत्साहात

पनवेल : वार्ताहर

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा व डॉ. रमेश पटेल यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 31) रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा झाला.

मावळते अध्यक्ष संजय झेमसे यांनी मागील वर्षभरात केलेले कार्य सांगून सर्व सदस्यांचे आभार मानले. त्यांनी रोटरी कॉलर नवीन अध्यक्ष विजय निगडे यांच्या गळ्यात घालून रोटरीचा चार्टर हस्तांतरित केला. मावळते सेक्रेटरी प्रदीप पाटील यांनीही पदाची कॉलर सेक्रेटरी महेश फुलपगार यांच्या वतीने सहसेक्रेटरी विकास चव्हाण यांच्या गळ्यात घातली. खजिनदार प्रसाद देशमुख यांनी अर्थ विभागाची कागदपत्रे नवीन खजिनदार प्राचार्य प्रशांत माने यांच्याकडे हस्तांतरित केली.

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा यांनी नवीन सर्व पदाधिकार्‍यांना येणार्‍या रोटरी वर्षाकरिता शुभेच्छा दिल्या आणि इंटरनॅशनल प्रेसिडेंट यांनी त्यांना दिलेली रोटरी पिन नवीन प्रेसिडेंट निगडे यांना दिली. शहा यांनी रोटरीच्या सामाजिक व इतर अनेक विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊनच्या कार्याचे कौतुक केले. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या 10 रोटेरियनसचे पिन व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

कार्यक्रमात डॉ. शैलेश पालेकर, गणेश म्हात्रे, पुंजाराम थोरात,  शिवाजीराव पाटील, विलास कावनपुरे, उमेश लाड, सुनील भोईटे, दिलीप आचरेकर, किशोर निकम, सामजिक कार्यकर्ते आणि मित्र मंडळी आपल्या कुटुंबासह मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य प्रशांत माने यांनी केले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply