Breaking News

सिंधूचा सेमीफायनलमध्ये पराभव

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल करणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपुष्टात आला आहे. चीनी तैपेईच्या ताई जू यिंगकडून सिंधूला 18-21, 12-21 अशा सरळ सेटमध्ये मात पत्करावी लागली. रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती सिंधू उपांत्य फेरीत कठीण आव्हान सादर करू शकली नाही. पहिल्या गेममध्ये ती चांगली प्रतिकार करीत होती, पण दुसर्‍या गेममध्ये ताई जू यिंग तिच्यावर वरचढ ठरली. आता कांस्यपदकाच्या लढतीत ती बिंगजाओसमोर खेळणार आहे. याआधी सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकही सेट गमावला नव्हता, मात्र या सामन्यात यिंगने तिचा प्रवास थांबवला. भारताला पदकाची आशा असलेल्या बॉक्सर अमित पांघल याचाही प्रवास टोकियो ऑलिम्पिकमध्ये संपला आहे. पुरुषांच्या फ्लाईवेटमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेला अमित उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करू शकला नाही. राऊंड 16मध्ये कोलंबियाच्या रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता हर्नी रिवास मार्टिनेझने त्याला 4-1ने पराभूत केले. भारताच्या तिरंदाजी पुरुष एकेरी स्पर्धेतील पदकाच्या आशाही मावळल्या आहेत. एलिमिनेशन राऊंड अर्थात उपउपांत्यपूर्व फेरीत भारताचा अव्वल तिरंदाज अतानू दास याला पराभवाचा सामना करावा लागला.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply