खालापूर : प्रतिनिधी
वडील गमावलेल्या आणि आई मानसिक रुग्ण असलेल्या खोपोलीतील आठ वर्षांच्या पूर्वा राहुल देवकुळे या मुलीच्या पुनर्वसनाची जबाबदारी रायगड चाईल्ड लाइन या संस्थेने घेतली आहे. तर पनवेलच्या जाण फाऊंडेशनने तिच्या संगोपन, शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे पूर्वाच्या आयुष्याला मिळाली नवी दिशा मिळाली आहे.
पूर्वा राहुल देवकुळे या अवघ्या आठ वर्षाच्या मुलीच्या आयुष्यात एका मागून एक संकटे येत होती. तिच्या वडिलांचे निधन झाले आणि आई मानसिक रुग्ण आहे. खोपोलीतील शांतीनगर भागात एका पडक्या घरात या मायलेकी अत्यंत हलाखीत राहत होत्या. पूर्वाच्या परिस्थितीची माहिती रायगड चाईल्ड लाइन या संस्थेस मिळाली. संस्थेने लागलीच जगदीश दगडे आणि रेखा भालेराव या स्वयंसेवकांना सर्वेक्षणासाठी पाठवले. संस्थेच्या निकषात पुर्वाचे जीवनमान येत असल्याने रायगड चाईल्ड लाइनने तिचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतली. तर जाण फाऊंडेशनने तिच्या संगोपन, शिक्षणाची संपूर्णतः जबाबदारी स्वीकारली आहे. पूर्वाच्या पुर्नवसनासाठी लागणार्या सर्व तरतुदी पूर्ण झाल्या आहेत. त्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी संपूर्ण सहकार्य केले. त्यामुळे आता पूवार्र्च्या पूर्व आयुष्यातील समस्यांना पूर्णविराम मिळणार आहे.
Check Also
पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी
सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …