Breaking News

संघनिवडीवरून ‘दादा’ नाराज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

वेस्ट इंडिजविरुद्धच्या भारताच्या दौर्‍यात प्रतिभावान फलंदाज शुभमन गिल आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे यांचा विचार करण्यात करण्यात आलेला नाही. याबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने नाराजी व्यक्त केली आहे.

टीम इंडियाचा विंडीज दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दौर्‍यात उभय देशांमध्ये तीन ट्वेन्टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, राहुल चहर, दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि खलिल अहमद यांसारख्या अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, परंतु शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांचा विचार करण्यात करण्यात आला नाही. यावरून सौरव गांगुली याने ट्विट करून निवड समितीच्या निर्णयावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

‘सध्या भारताकडे असे अनेक खेळाडू आहेत जे तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करू शकतात. असे असूनही शुभमन गिल, अजिंक्य रहाणे यासारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले नाही याचे मला आश्चर्य वाटते,’ अशा शब्दांत गांगुलीने नाराजीला वाट करून दिली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply