कर्जत भाजपचे तहसीलदारांना निवेदन
कडाव : प्रतिनिधी, कर्जत : बातमीदार
महापूरामुळे नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील नागरिकांना पूरग्रस्त असल्याचे दाखले आणि नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या कर्जत मंडळाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वार केली.
जुलै महिन्यात कर्जत तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाणी घुसून अतोनात नुकसान झाले. अनेकांच्या घरातील किमती वस्तू, कपडेलत्ते, अन्नधान्य भिजून नुकसान झाले आहे. पुरामध्ये महत्वाची कागदपत्रे वाहून गेल्याने काही लोकांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. या आपद्ग्रस्तांना तातडीने पूरग्रस्त असल्याचे दाखले द्यावेत त्याचप्रमाणे जेवढे नुकसान झाले आहे, तेवढ्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, असे कर्जत भाजपने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नायब तहसीलदार राठोड यांनी निवेदन स्वीकारून, आपली मागणी वरिष्ठांना कळवितो आणि जास्तीत सहकार्य करतो, असे सांगितले.
भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे, भाजपचे जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, शहराध्यक्ष बळवंत घुमरे, शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, शहराध्यक्ष मयूर शितोळे, उपाध्यक्ष सार्थक घरलुटे, सरचिटणीस रावळ, चिटणीस सर्वेश गोगटे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा स्नेहा गोगटे, उपाध्यक्षा शर्वरी कांबळे, कोकण सोशल मीडिया संयोजक गायत्री परांजपे, अभिषेक तिवारी, मारुती जगताप, सूर्यकांत गुप्ता, तसेच कुमार कडू, विराज पाटील यांच्यासह पूरग्रस्त नागरिक आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्याचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता. पुराचे पाणी अनेक घरांमध्ये शिरुन कपडालत्ता, अन्नधान्यासह चिजवस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे वाहून गेली. त्याची शासनाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
-प्रकाश पालकर, सरचिटणीस, कर्जत शहर भाजप