
पनवेल : बातमीदार
पोलीस असल्याचे सांगून एका 70 वर्षीय पुरुषाच्या हातातील व गळ्यातील 60 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना कामोठे येथे घडली आहे. अज्ञातांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामोठे, सेक्टर 21 येथील भीमराव भैरू पाटील हे सोसायटीच्या बिल्डिंगच्या खाली बसलेले होते. या वेळी त्यांच्याजवळ मोटरसायकलवरून दोन इसम त्यांच्या जवळ आले. व त्यापैकी एकाने आम्ही पोलीस आहोत, आमचे साहेब तुम्हाला बोलवत आहेत असे त्यांनी भीमराव याना सांगितले. या वेळी ते भीमराव यांना घेऊन फळ मार्केट जवळ गाडीवर असलेल्या व्यक्तीकडे घेऊन गेला. या वेळी इकडे रात्री हाफ मर्डर झालेला आहे व चाकू दाखवून सोने काढून नेले असल्याचे त्यांनी भीमराव यांना सांगितले व तुमच्या हातातील अंगठी आणि गळ्यातील चेन रुमालात काढून ठेवायला सांगितले व तो रुमाल त्यांनी भीमराव यांच्याकडे दिला. थोड्यावेळाने त्यांनी त्यांचा रुमाल पाहिला असता त्यात अंगठी आणि चेन सापडून आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.