Breaking News

रायगडातील एसटी कर्मचार्यांचे वेतन थकले

मुरूड : प्रतिनिधी

एसटीच्या रायगड विभागातील सर्व कर्मचार्‍यांचे पगार न झाल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचार्‍यांचे वेतन होतात. मात्र ऑगस्ट महिन्याची 13 तारीख उलटून गेली तरी एसटी कर्मचार्‍यांना वेतन मिळालेले नाही. शनिवार, रविवारी बँकांना सुट्टी असल्याने आता 15 ऑगस्ट नंतरच पगार होणार असल्याने कर्मचार्‍यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

एसटीच्या रायगड विभागात आठ  आगार असून एक विभागीय कार्यालय व एक कार्यशाळा आहे. तेथे सुमारे 2700 पेक्षा जास्त कर्मचारी असून त्या सर्वांचा पगार रखडला आहे. एसटी प्रशासनाने लवकरात लवकर वेतन द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply