Breaking News

पनवेल परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख अतिथी अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी होऊ न देण्यासाठी या वेळी केवळ महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख अतिथी अर्चना परेश ठाकूर यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना नमूद केले की, 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना असे लक्षात येते की आपला देश अत्यंत वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोरोना संकटातसुध्दा आपल्या देशाने उल्लेखनीय कार्य केले आहे. आपण सर्वांनी एकजुटीने आपला देश मजबूत केला पाहिजे.

प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अर्चना परेश ठाकूर तसेच संस्थेचे कार्यकारणी सदस्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, नकटी सर, विद्यार्थ्यांचे आणि विधी महाविद्यालयाच्या सर्व हितचिंतकांचे आभार मानले.

प्राचार्या गावंड त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, खरी देशभक्ती सिध्द करण्यासाठी आपल्याला बॉर्डरवर जाण्याची गरज नसून आपण करत असलेली कामे प्रामाणिकपणे आणि वेळच्यावेळी केली तर ती सुध्दा एका अर्थाने देशसेवाच ठरेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक संघप्रिया शेरे यांनी केले. या वेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रियांका उंडे, निनाद शेंडगे, भाग्यश्री पाटील, हितेश छटानी, पल्लवी खोत, हृषीकेश हुद्दार, उज्वल पाटील, प्रमोद कोळी, संजय दरवडा, नितीन कोळी, सचिन पवार, महेश घरत, महेश पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

उलवे नोड : येथील भारतीय जनता पक्ष कार्यालय येथे एम. डी. खारकर व दयानंद जानू म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply