कर्जत : बातमीदार
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून जीवनविद्या मिशनच्या डोंबिवली शाखेने ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या कर्जत तालुक्यातील भिवपूरी या गावात नुकताच वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. सद्गुरु श्री वामनराव पै यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगताना ’पर्यावरण हाच नारायण’ असा दिव्य विचार दिला आहे. जीवनविद्या मिशन ही संस्था 2022-2023 हे वर्ष श्री सद्गुरू जन्मशताब्दी वर्ष साजरे करत आहे. त्या अंतर्गत कर्जत तालुक्यातील भिवपुरी गाव जीवनविद्या मिशनच्या डोंबिवली शाखेने दत्तक घेतले आहे. जीवनविद्या मिशनच्या ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत डोंबिवली शाखेने भिवपुरी गावात 100 रोपांची लागवड केली. सरपंच संगीता माळी, ग्रामसेविका अनुजा ऐनकर, कृषी अधिकारी लोहकरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात जीवनविद्या मिशन डोंबिवली शाखेचे अध्यक्ष भावेश कचरे, सचिव सुमित शिगवण, युवा स्वयंसेवक मनोहर फाकटकर, सुश्मिता बार्शी, प्रशिक साखरे, शैलेंद्र मुंज, निखिल बोडके, ओम पेडणेकर, आरती पांढरपट्टे, आदित्य पन्हाळे, स्वानंद बिनसाळे, उमेश खोचरे, सागर कचरे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.