Monday , February 6 2023

पोलादपुरात वाकण हद्दीतील घरे, शेतजमिनींना तडे

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील वाकण ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील धामणेचीवाडी आणि सानेवाडी येथील जमिनीला आणि घरांना भेगा पडल्या असून, तेथील ग्रामस्थांना कापडे येथील तात्याबा साने यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे. या ग्रामस्थांच्या चाळीसहून अधिक म्हशी, गाय, बैल, वासरू या पशुधनासाठी मोकळ्या जमिनीवर कोंडवाडा बांधण्यात आला असून, तेथे त्यांना ठेवण्यात आले आहे.  धामणेचीवाडी आणि सानेवाडी येथे जमिनीला पडलेल्या भेगा थेट आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावाच्या डोंगरापर्यंत पोहचल्या आहेत. घरातील भिंती आणि जमिनीला पडलेल्या भेगा घराबाहेरील जमीनीलाही दूरवर पडल्या असल्याचे दिसून येत आहेत. या भेगा डोंगरदरीत मोठ्या आकाराच्या दरडी कोसळल्यानंतर तयार झाल्या असाव्यात, असा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी 27 ते 30 ऑॅगस्ट या कालावधीत भुगर्भ वैज्ञानिकांचे पथक येणार असून त्यांच्या अहवालानुसार येथील ग्रामस्थांचे स्थलांतर व पुनर्वसनासाठी शासनाकडे शिफारस करण्यात येईल.

-समीर देसाई, प्रभारी तहसीलदार, पोलादपूर

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply