Breaking News

भाजयुमोतर्फे 75 किमी सायकल रॅली

पनवेल : वार्ताहर

भारताच्या 75व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) संपूर्ण देशभरात भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरामध्ये 75 किलोमीटर मॅरेथॉन किंवा सायकल रॅली अशा युवा संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 62 संघटनात्मक जिल्ह्यामध्ये सायकल रॅली झाली.

या उपक्रमामध्ये प्रत्येक जिल्ह्यात साडेसात किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विक्रांत पाटील हे नवी मुंबई येथे सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या वेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रभारी प्रशांत कदम व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply