Breaking News

चौथ्या कसोटीसाठी इशांतला मिळणार डच्चू?

लंडन ः वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी 2 सप्टेंबरपासून द ओव्हलवर होणार आहे. भारतीय संघाने दुसर्‍या कसोटीत शानदार विजय मिळवल्यानंतर तिसर्‍या कसोटीत भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव झाला होता. इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात काही बदल होणार आहेत.भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे पुढील दोन कसोटीतून बाहेर पडू शकतो. तिसर्‍या कसोटीत इशांत पूर्ण फिट नव्हता. कर्णधार विराट कोहलीने त्याच्या कामगिरीवर बोलण्यास नकार दिला, पण गोलंदाजांच्या वर्कलोडनुसार संघात बदल केले जातील. इशांतसोबतच अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्याची दुखापत गंभीर नाही, पण चौथ्या कसोटीत ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याचा समावेश होण्याची शक्यता आहे. अश्विनने सरे संघासोबत काऊंटी क्रिकेटमध्ये याच मैदानावर चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे चौथ्या कसोटीत त्याला बाहेर ठेवणे भारतासाठी परवडणारे नसेल. इशांत संघाबाहेर झाल्यास त्याच्या जागी उमेश यादव किंवा शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाला संघात स्थान मिळू शकते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply