Breaking News

फिनो बँकेच्या माध्यमातून डिजिटल बँकिंग सेवा

पेण : प्रतिनिधी

फिनो बँकेच्या शाखेमधून ग्राहकांना डिजिटल सेवा देण्याचा बँकेचा हेतू असून आज गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पेणमध्ये फिनो बँकेच्या आउटलेटची सुरुवात विभुते इन्टरप्रायजेसच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती बँकेचे कोकण मुख्य प्रबंधक गौतम जाधव यांनी दिली.

पेणमधील फिनो बँकेच्या डिजिटल सेवा देणार्‍या शाखेची सुरुवात चिंचपाडा येथे करण्यात आली असून या वेळी बँकेतर्फे देण्यात येणार्‍या सेवेची माहिती पत्रकार परिषदेत गौतम जाधव यांनी दिली. या वेळी प्रबंधक मिलिंद खैरनार, मंगेश घोडके, प्रभारी प्रमुख मयूर झेमसे, प्रबंधक दत्ता मराठे, जनसंपर्क अधिकारी ऊर्मिला देठे, विभुती इंटरप्रायझेसचे प्रियांका पाटील, हर्षद म्हात्रे, आशिष भगत आदी कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना काळात डिजिटल बँकिंग सेवेला महत्त्व आले असून ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचे कामही या वेळी करण्यात आले आहे. खाते उघडणे, आधार पेमेंट, पैसे जमा करणे, पैसे काढणे, दुसर्‍या खात्यात रक्कम पाठिवणे, डेबिट कार्ड सुविधा अशा अनेक प्रकरच्या सुविधा या माध्यमातून होणार असून विशेष करून फेरीवाले, कामगार वर्ग यांना या सेवेचा उपयोग होत असल्याचे जाधव यांनी सांगितले. या वेळी ही सेवा कशा प्रकारे ग्राहकांना देण्यात येईल याचे प्रात्यक्षिक मिलिंद खैरनार यांनी करून दाखविले. ग्राहकांनीही जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply