Breaking News

पनवेलमध्ये किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण

शिवरायांच्या स्मृती जागवण्याचे कार्य -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
किल्ले स्पर्धेचे आयोजन करून जाणीव एक सामाजिक संस्थेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती जागवण्याचे काम केले असल्याचे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. ते किल्ले स्पर्धेच्या
बक्षीस वितरण समारंभात बोलत होते.
जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 18 अंतर्गत दिवाळीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी (दि. 8) पनवेल शहरातील वडाळे तलावाजवळील बल्लाळेश्वर मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात झाला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, अजय कांडपिळे, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, नीता माळी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप, युवा नेते केदार भगत, सोशल मीडिया सेल संयोजक प्रसाद हनुमंते, वॉर्ड अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुहासिनी केकाणे, आदिती मराठे,
जयश्री तांबोळी, वैभवी गुरव, संजीवनी खिल्लारे, सचिन नाझरे, रूपेश नागवेकर, महेश सरदेसाई, प्रीतम म्हात्रे, राजा चव्हाण, राजू सावंत, युवा मोर्चा ओबीसी सेल सरचिटणीस प्रसाद म्हात्रे, उमेश इनामदार शैलेश कदम, परेश बोरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
या स्पर्धेत 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यशोपुरम सोसायटीने उभारलेल्या पन्हाळा किल्ल्याने प्रथम, वीर सावरकर चौक संघाने बांधलेल्या कुलाबा किल्ल्याने द्वितीय, हरिओम नगर सोसायटीने बांधलेल्या रायगड किल्ल्याने तृतीय क्रमांक पटकाविला, तर जिंदाल सोसायटीने बांधलेला पद्मदुर्ग, आदित्य फके यांनी उभारलेला तोरणा किल्ला, कैलाश पार्क सोसायटीने बांधलेला सिंहगड आणि मुनोथ नगर सोसायटीने बांधलेल्या रामशेज किल्ल्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. या सर्व विजेत्यांना माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून या वर्षी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असून सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून अनुभवता यावा यासाठी किल्ले स्पर्धेत सहभागी प्रत्येक मावळ्यास मोफत रायगड दर्शन घडविण्यात येणार आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply