Breaking News

उरण मतदारसंघात मविआ, शेकापला पराभवाची धूळ चारीत आमदार महेश बालदी विजयी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार महेश बालदी यांना मतदारांचा मोठा कौल मिळाला असून शेकापचे उमेदवार प्रितम म्हात्रे व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना पराभवाची धूळ चारली आहे.
आमदार महेश बालदी यांना एकूण 95 हजार 55 मते मिळाली असून, शेकापचे तरुण उमेदवार प्रितम म्हात्रे यांची विधानसभेची पहिली निवडणूक असून, यांना दुसर्‍या क्रमांकाची 87 हजार 248 मते मिळाली त्यांचा महेश बालदी यांनी सात हजार 807 मताधिक्याने पराभव केला आहे. मनोहर भोईर हे 2019 पासून सलग दोनदा पराभूत होऊन या निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकावर फेकले आहेत. भोईर यांना 71 हजार 276 मतांवर समाधान मानावे लागले आहे. त्यांना 23 हजार 779 मताने पराभव पतकरावा लागला आहे. 2019ला अपक्ष आमदार म्हणून उरण विधानसभा मतदार संघात प्रतिनिधीत्व करीत असलेले आमदार महेश बालदी यांना विकास कामांच्या जोरावर येथील जनतेने कौल दिला आहे.या विजयाने भाजप कार्यकर्त्यांनी
जासई येथील विधानसभा निवडणूक कार्याजवळील दास्तानफाटा येथे भाजपचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला आहे.
उरणचे विजयी उमेदवार महेश बालदी यांची उरण शहरात भिव्य विजयी मिरवणूक निघाली. या वेळी भाजपाचे तालूका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, माजी नगरसेवक राजेश ठाकूर, विजय भोईर, शेखर तांडेल, उद्योजक राजाशेठ खारपाटील, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, राणी म्हात्रे, सुशील राऊत, प्रवीण घासे, कुलदीप नाईक, शशिकांत पाटील, प्रशांत ठाकूर, प्रदीप ठाकूर, चंद्रकांत घरत, मेघनाथ तांडेल, शहराध्यक्ष कौशिक शाह, निलेश पाटील, जविंद्र कोळी, प्रदीप नाखवा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरण विधानसभा मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या निवडणुकीत घेतलेली प्रचंड मेहेनत, मतदार संघातील विकासकामे आणि राज्य सरकारने लोकसभेनंतर कार्यान्वित केलेली लाडकी बहीण योजना घराघरातील बहिणीपर्यंत पोहचविल्याने हा मोठ्ठा विजय संपादन केला आहे. याशिवाय यापुढेही उरण विधानसभा मतदार संघातील जनतेच्या विकास कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यासाठी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करू, असे आमदार महेश बालदी म्हणाले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply