Breaking News

भाजपचा अवैध वाहतूकदारांना दणका

आरटीओकडून दोन लाख 78 हजारांचा दंड वसूल
नवभारतीय शिववाहतूक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर
भारतीय जनता पक्ष ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेने अवैध वाहतूक करणान्या विरोधात आरटीओ कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कामाला लागले असून वायुवेग पथकाद्वारे अवैध वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करणार्‍यास सुरुवात केली असून त्यांच्याकडून दोन लाख 78 हजारांचा दंड वसूल केला.
राज्यभरात चालत असलेल्या अवैध वाहतूक करणार्‍यांवर कडक कारवाई झाली नाही तर 28 डिसेंबर रोजी आमदार आशिष शेलार आणि भारतीय जनता पक्ष ट्रान्सपोर्ट सेल प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस निलेश निम्हण व रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील यांनी दिला होता.
आंदोलनाच्या इशार्‍यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय कामाला लागले असून वायुवेग पथकाद्वारे कळंबोली मॅक्डोनाल्ड, खालापूर टोल नाका तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावर विशेष तपासणी मोहिम राबवण्यात आली. तपासणीदरम्यान प्रवाशांच्या वैयक्तिक सामाना व्यतिरिक्त बसमधील व्यापारी मालाची अवैध वाहतूक करणार्‍या 21 प्रवासी बसेसवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये त्यांच्या कडून दोन लाख 78 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात असून यापुढे सुद्धा सदर कारवाई पुढे सुरू राहणार असल्याचे प्रादेशिक वरिवहन कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.
त्यामुळे तूर्तास सदर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील यांनी सांगितले.

 

 

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply