Breaking News

रायगडसह राज्यातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कोकण, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यांचा विचार करता रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र येथे पावसाचा जोर कायम राहील. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभरात पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. गणेशोत्सवादरम्यानही सरींवर सरी कोसळत असून श्रीगणेशाचे स्वागतदेखील वरुणराजाने जोरदार केले. त्यानंतरही पावसाची संततधार कायम आहे. असे असले तरी गणेशभक्तांचा उत्साह कायम असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply