Breaking News

पनवेलमध्ये लसीकरण केंद्रात वाढ

पनवेल : प्रतिनिधी

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्याकरिता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविड लसीकरणासाठी चार नवीन  केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने कळंबोली येथे सुधागड एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि डी. जी. तटकरे न्यू इंग्लीश मिडीयम शाळा तसेच मोठा खांदा येथील जिल्हा परिषद शाळा आणि माजी आमदार दत्तूशेठ पाटील हायस्कूल या चार ठिकाणी नवी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या वेळी  27 ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लसींचे डोस देण्यात आले.पनवेल महानगरपालिकेच्या वतीने लसीकरणास गती दिली जात असून तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवरती जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्याकरिता पनवेल महापालिका प्रयत्नशील आहे.

पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा चांडक  लसीकरण केंद्राचे नियोजन करत आहेत. रविवारी (दि. 12) सुधागड एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूलमध्ये 509, डी.जी. न्यू इंग्लीश मिडीयम शाळेमध्ये 444 तसेच मोठा खांदा येथील जिल्हा परिषद शाळेत 200, माजी आमदार दत्तूशेठ पाटील हायस्कूलमध्ये 380 डोस देण्यात आले.  महानगरपालिका क्षेत्रातील 36 केंद्रावर एकुण 10 हजार 571 डोस देण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply