खालापूर ः प्रतिनिधी
औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीतील खेळाडूंनी यश मिळविले आहे. वेगवेगळ्या वजनी गटात खोपोलीतील योगेश पुजारी, दिनेश पवार, प्रीतम मंडल यांनी सुवर्ण, अक्षय शनमुगन, योगेश पुजारी, कृणाल पिंगळे यांनी रौप्य आणि शुभम कंगळे याने कांस्यपदक जिंकले. यशस्वी युवक येत्या काही दिवसांत गोव्यात होणार्या राष्ट्रीय आणि त्यानंतर हाँगकाँग येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रयत्न आणि सराव करीत आहेत. या सर्वांचे कौतुक होत आहे. रायगड जिल्ह्यातील खेळाडू विविध क्रीडाप्रकारांत चमकदार कामगिरी करून पदके जिंकत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे नाव उंचावले जात आहे.