Breaking News

माथेरानमध्ये मॅरेथॉनला प्रतिसाद; आशिष पुणतांबेकर प्रथम

कर्जत ः बातमीदार

कोरोनामुळे पूर्णतः बंद असलेले माथेरान मागील चार महिन्यांपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर माथेरानचे पर्यटन पुन्हा बहरावे यासाठी मुंबई व पुणे येथील रनबडीज या संस्थेने रविवारी (दि. 10) माथेरानमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. या स्पर्धेत 50 किमी अंतराच्या पुरुषांच्या वरिष्ठ गटात आशिष पुणतांबेकर प्रथम आले. देशाच्या विविध भागांतील 200 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सकाळी 6 वाजता स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. 10, 25, 35 व 50 किमी अशी चार टप्प्यांत, तसेच विविध वयोगटांत स्पर्धा झाली. यामध्ये 10 किमी पुरुष गटात वैभव रामतीर्थे, 25 किमी पुरुष गटात अनिल कोर्वी, वरिष्ठ गटात चार्ल्स टेंज, महिला गटात वर्षा थेटे, वरिष्ठ गटात पूजा वर्मा, 35 किमी गटात प्रदीप पाटील, वरिष्ठ गटात संदेश जाधव, महिला गटात विजयाभारती भट, 45 वर्षावरील वयोगटात बिरज जगताप, महिलांमध्ये रिचा पारेख व वरिष्ठ गटात हेन्रीजेत्ता नायक आणि 50 किमी पुरुष गटात सिद्धेश भिडे व वरिष्ठ गटात आशिष पुणतांबेकर प्रथम आले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माथेरानमधील एका हॉटेलमध्ये झाला. या वेळी रनबडीज संस्थेचे संचालक अरविंद बिचवे यांनी ही स्पर्धा माथेरानच्या पर्यटनवाढीसाठी व निसर्ग संवर्धनासाठी घेतली असल्याचे सांगितले. या स्पर्धेचे प्रायोजक हृतिक रोशन यांची ‘एचआरएक्स’ होती. कोविड-19चे सर्व नियम पाळून स्पर्धा घेण्यात आली. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत त्यांनाच या मॅरेथॉनमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply