Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये भाजपचे बूथ जनसंपर्क अभियान

पेण : प्रतिनिधी

आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये भाजपच्या जनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत वढाव पंचायत समिती गणाची बैठक नुकतीच वढाव येथे झाली. भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी बूथ प्रमुखाची फार महत्त्वाची भूमिका असते, असे मत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळी व्यक्त केले.

भाजपच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय बुथ संपर्क अभियान सुरू आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस शिवाजी पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा तन्वी पाटील, जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे, लक्ष्मण जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण तालुक्यात ठिकठिकाणी बूथ संपर्क अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत वढाव पंचायत समिती गणाची बैठक नुकतीच वढाव येथे झाली. सरपंच पूजा पाटील, वाशी सरपंच गोरक्षनाथ पाटील, व्ही. बी. पाटील, वडखळचे माजी उपसरपंच रवी म्हात्रे, मसद सरपंच बळीराम भोईर, शेडाशी सरपंच बाबू कदम, रावे सरपंच संध्या पाटील, दादर सरपंच विजय पाटील, वरप उपसरपंच दामू कदम, शिर्की उपसरपंच प्रवीण पाटील, हमरापूर उपसरपंच गणेश पाटील, कोपर सरपंच नवनाथ म्हात्रे, कणे सरपंच कुणाल पाटील यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.

बूथ कमिटी अधिक सक्षम करून, पक्ष अधिक बळकट करून येणार्‍या निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळवायचे आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळी केले.

भारतीय जनता पक्ष व आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण पेण तालुक्यात विविध विकासकामे  सुरू असून, पुढेही विकास निधी कमी पडू देणार नाही, असे वैकुंठ पाटील यांनी या वेळी सांगितले. जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

गडब, पाबळ, शिहू, शेडाशी, दूरशेत, हमरापूर, रावे, कोळवे येथे जाऊन या सर्व मंडळींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी सर्व स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्या बूथ जनसंपर्क अभियानामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप एक नंबरचा पक्ष असेल, असे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply