पेण : प्रतिनिधी
ई-महाभूमी प्रकल्प राज्य समन्वय अधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संवर्गासंदर्भात असंवैधानिक शब्द वापरल्यामुळे तलाठी वर्गात संताप उसळला आहे. पेणमधील तलाठी संघटनेने सोमवारी (दि. 11) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जगताप यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.
तलाठी संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष आर. जे. सूर्यवंशी, उपाध्यक्ष एस. एल. विधाते, सचिव गंगाधर कोरडे, खजिनदार सारिका तांडेल, सल्लागार सुरेंद्र ठाकूर, संघटक निनाद पाध्ये, विलास म्हात्रे, मदन कारोट यांच्यासह तलाठी व मंडळ अधिकारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
समन्वय अधिकारी रामदास जगताप यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही धरणे आंदोलन करीत असल्याचे आर. जे. सूर्यवंशी यांनी या वेळी सांगितले.