Breaking News

नेरळमधील शिबिरात पाचशे महिलांचे लसीकरण

कर्जत : बातमीदार

मिशन कवच कुंडल मोहिमेंतर्गत कर्जत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सोमवारी (दि. 11) तब्बल 26 ठिकाणी लसीकरण शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांना महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मंगेश म्हसकर मित्र मंडळाच्या वतीने व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नेरळ गावात सोमवारी महिलांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. त्या वेळी भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, नेरळच्या सरपंच उषा पारधी, ग्रामपंचायत सदस्य राजन लोभी, श्रद्धा कराळे, संतोष शिंगाडे, तसेच नम्रता कांदळगावकर, शिवानी पोतदार, उमा खडे, गीतांजली देशमुख, श्रद्धा नरेंद्र कराळे, धनंजय धुळे, प्रकाश पेमारे आदी या वेळी उपस्थित होते. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 350 महिलांनी पहिला, तर 150 महिलांनी दुसरा डोस घेतला.

कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि नगर परिषद यांच्या माध्यमातून शहरातील कपालेश्वर मंदिर आणि रॉयल गार्डन सभागृह येथे लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते, तर माथेरान नगर परिषदेच्या माध्यमातून नगरपालिका दवाखान्यात महिलांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी या शिबिराला उपस्थिती लावली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply